प्रा. मोहन आपटे (जन्म : कुवेशी, राजापूर तालुका, कोकण, ५ डिसेंबर १९३८; - मुंबई, १२ नोव्हेंबर २०१९) - ) हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, वैज्ञानिक व मराठी लेखक होते.
मोहन आपटे यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून भौतिकशास्त्रातील पदवी घेतल्यावर त्यांनी अहमदाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेत ते कुस्ती शिकले होते. विज्ञानाबरोबरच त्यांना चित्रकलेतही स्वारस्य होते. ते कविता पण करायचे.
मुंबईतील भारतीय विद्याभवन संचालित सोमाणी महाविद्यालयात १९६६ ते १९९८ या काळात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख असताना ते निवृत्त झाले.
मोहन आपटे
यामागील विज्ञान आणि इतिहास.