चला हवा येऊ द्या हा नितीन केणी निर्मित बहुचर्चित झी मराठी दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करतात. काहीवेळा ह्या कार्यक्रमाचे सोम ते बुध / गुरू / शुक्र विशेष भाग अथवा रविवारी दोन किंवा तीन तासांचे विशेष भाग देखील दाखवले जातात. २०२० च्या दिवाळीपासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत स्वप्नील जोशीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित लावली.
ह्या मालिकेत मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट आणि थीम साठी यातील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची, नाटकाची किंवा प्रसारित मालिकेची माहिती देतात. तसेच काहीवेळा या मंचावर अनेक हिंदी कलाकारांना देखील बोलावले जाते. ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना थुकरटवाडी या गावातील घडणाऱ्या गमती जमतींवर आधारित आहे. थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ही पत्रे अरविंद जगताप लिखित असतात.
कमी भागात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सुप्रसिद्ध काॅमेडी शो आहे. निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.
चला हवा येऊ द्या
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.