संजय संगवई

थोडक्यात पण महत्त्वाचे.

संजय व्यंकटेश संगवई (२३ डिसेंबर, इ.स. १९५९ देगलूर, नांदेड - २९ मे, इ.स. २००७ कोची, केरळ ) हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यमतज्ज्ञ, माध्यम चिकित्सक होते. ते नर्मदा बचाव आंदोलनाचे पूर्णवेळ कार्यकर्ता आणि जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे (एन.ए.पी.एम.(NAPM Archived 2015-09-11 at the वेबॅक मशीन.)) समन्वयक होते. मेधा पाटकर यांचे ते निकटवर्ती होते. "अभिव्यक्ती (त्रैमासिक)" या नासिक येथून प्रसिद्ध होणाऱ्या माध्यम विषयक मराठी त्रैमासिकाचे संपादक होते. "माणूस" साप्ताहिकात त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर, तसेच शास्त्रीय संगीतावरही जाणकारीने विपुल लेखन केले.

संजय संगवई अनेक वर्षे हृदयविकाराने आजारी होते. या विकारावर औषधोपचार करण्यासाठी ते केरळमधील कोची येथे एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले.

पर्यायी पत्रकारिता ही विकासाभिमुख पत्रकारितेची संकल्पना संजय संगवई यांनी त्यांच्या लेखनातून रुजविली. त्यांचे सारे लेखन त्यांनी याच हेतूने केले होते. संजय संगवई यांच्या मृत्युनंतर त्यांच्या स्मरणार्थ प्रकाशित केलेल्या अंकात त्यांचा 'संन्यासी माध्यमकर्मी' असा गौरव अभिव्यक्तीच्या संपादकीयात करण्यात आला आहे.

संजय संगवई हे शास्त्रीय संगीताचे आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश आणि रशियन भाषा अवगत होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →