मोहन गोखले

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मोहन वसंत गोखले (जन्म : पुणे, ७ नोव्हेंबर १९५३; - मद्रास, २९ एप्रिल १९९९) हे मराठी अभिनेते-दिग्दर्शक होते. त्यांनी मराठी नाटके आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. अभिनेत्री शुभांगी गोखले (माहेरच्या शुभांगी संगवई) या त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सखी गोखले ही त्यांची मुलगी आहे.

मोहन गोखले हे शाळेत असल्यापासूनच नाट्यवाचनात भाग घेऊ लागले. पुढे पुण्यातील सर परशुराम आणि फर्ग्युसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा त्यांनी 'ती येते', 'कैद' अशा एकांकिकांनी अक्षरशः गाजवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →