शीला बालाजी ह्या एक भारतीय महिला असून त्या भारतीय शैक्षणिक विना-नफा संस्था (NGO) 'एम फॉर सेवा' (AIM For Seva)चे नेतृत्व करतात. भारतात मोफत शिक्षण देणाऱ्या सर्वात मोठ्या संस्थांपैकी ही एक संस्था आहे. त्यांची अजून एक ओळख म्हणजे त्या साळीच्या (तांदळाच्या) विविध प्रकारच्या जातींचे संकलन आणि संवर्धन करतात. याची सुरुवात चार जातींपासून झाली होती आणि आता त्यांच्याकडे साळीच्या सुमारे तीस जाती आहेत. शीला यांना या प्रमुख दोन कार्यांसाठी भारतातील, खासकरून स्त्रियांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शीला बालाजी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.