अंबिका बेरी (पूर्वाश्रमीच्या: अंबिका सभरवाल) या भारतीय कलादालनाच्या (इंडियन आर्ट गॅलरीच्या) मालक आहेत. अंबिका जुन्या कचऱ्यापासून अशा कलाकृतींना जन्म देते ज्यामुळे लोकांच्या घरांचे सौंदर्य वाढते. जुन्या वस्तूंपासून बनवलेल्या अमूल्य कलाकृतींनी, त्यांनी मैहरच्या इचौल या गावाला अद्भुत कलेचे केंद्र बनवले आहे. हे गाव आता कलाकार, लेखक आणि शिल्पकारांसाठी भारतातील सर्जनशील आश्रयस्थान बनले आहे. याकामासाठी बेरी यांना २०१८ साली नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंबिका बेरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!