शितला देवी ही हिंदू धर्मातील एक देवता असून या देवीला आई भगवतीचे रूप म्हणून ओळखले जाते. जवळपास भारतभर या देवीची उपासना करताना दिसून येते.
स्कंदपुराणानुसार जेव्हा देवतांनी भगवतीच्या आराधानेसाठी अग्नी प्रज्वलित केला, तेव्हा त्यातून शितला देवी प्रकट झाली. या देवीचे वाहन गाढव असून एका हातात चांदीचा झाडू आणि दुसऱ्या हातात शीतल जल असलेले भांडे दिसून येते. ही देवी विविध प्रकारचे ज्वर, गोवर आणि कांजण्या यांचा नाश करणारी देवता आहे अशी मान्यता आहे.
शितला देवीचा मंत्र:-
बौद्ध धर्मानुसार, शितला देवी आणि ज्वरासुर नावाचा राक्षस हे पार्णशबरी देवीचे सोबती आहेत. पार्णशबरी ही बौद्ध धर्मातील आजार निर्माण करणारी देवता आहे, आणि तिच्या दोन बाजूला शितला देवी आणि ज्वरासुर नावाचा राक्षस उभे असतात.
शितला
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?