अन्नपूर्णा (देवी)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अन्नपूर्णा (देवी)

अन्नपूर्णा (शब्दशः अर्थ - अन्नाने भरलेली) ही हिंदू देवता आहे. हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे, असे मानले जाते. भरतचंद्र रे यांनी अन्नदा मंगल या बंगालीमध्ये लिहिलेल्या स्तोत्रात तिची स्तुती केली आहे. या देवीची अतिशय कमी मंदिरे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे वाराणसी येथील अन्नपूर्णा देवी मंदिर. अक्षय्य तृतीया हा दिवस अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस मानला जात असल्यामुळे हा दिवस सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →