छिन्नमस्ता ही देवी पार्वतीचे रूप असून दहा महाविद्यांपैकी एक आहे. या देवीचे प्रचंड कालिका,प्रचंडचंडिका असेही अनेक नावे आहेत.
या देेेवीच्या एका हातात तिचे मस्तक व एका हातात शस्त्र आहे. गळ्यात हाडकांची माळ आहे. यज्ञात छिन्नमस्ता देवीला आवाहन केल्यास तिचे डोके तिच्या धडावर येते.
छिन्नमस्ता जयंती ही वैशाख शुद्ध चतुर्दशीला असते.
हिंदू धर्मातील देवी-केंद्रित परंपरेनुसार शाक्त पंथातील कालीकुला संप्रदायामध्ये छिन्नमस्ताची पूजा करतात. जरी छिन्नमस्ता देवी हिला महाविद्यांपैकी एक म्हणून संरक्षित स्थान प्राप्त झाले असले तरी तिची मंदिरे मुख्यतः नेपाळात आणि पूर्व भारतात आढळतात, आणि तिची सार्वजनिक पूजा दुर्लभ आहे. ती एक तांत्रिक देवता आहे आणि गूढ तांत्रिक अभ्यासक तिची उपासना करतात. 'छिन्नमस्ता ही चिन्नमुंडाशी संबंधित आहे - ती तिबेट बौद्ध देवी वज्रयोगिनीचे तुच्छ-मुंडक रूप आहे. शाक्तपंथमतानुसार छिन्नमस्ताची उपासना करणारे राहूच्या प्रभावापासून मुक्त होतात.
छिन्नमस्ता
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.