लक्ष्मी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

लक्ष्मी

लक्ष्मी (/ˈlʌkʃmi/; संस्कृत: लक्ष्मी, IAST: lakṣmī, इंग्रजी: Lakshmi (Laxmi)) ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. ती सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणांमधील समुद्रमंथन कथेनुसार ती समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्‍नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली. देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आई तिरंगिनी यांची कन्या आहे.

ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्रीनारायण (विष्णू) सहित रामावतारात ती सीता बनली; कृष्णावतारात ती राधा स्वरूपात अवतरली; दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती; कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर घेणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →