श्रीलक्ष्मी नारायण

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

श्रीलक्ष्मी नारायण

श्रीलक्ष्मीनारायण वा लक्ष्मी-नारायण (संस्कृत: लक्ष्मी-नारायण, IAST: Lakṣmīnārāyaṇa) हा हिंदू देवता, नारायण(विष्णू)आणि त्यांची पत्नी भगवती देवी लक्ष्मी यांच्या जोडपे रूपात आहे.श्रीवैष्णवपंथातील आराध्य देवता आहे. नारायण(विष्णू) विश्वाचे पालनकर्ता ईश्वर आहे.वैकुंठामध्ये शंख, कौमोदकी गदा, कमळ आणि सुदर्शन चक्र धारण करणारा नारायण बाजूला लक्ष्मी, सौंदर्य देवी दर्शविली गेली आहे. त्यांची पत्नी लक्ष्मी देवी ही ऐश्वर्य, प्रकृति ,शांती आणि समृद्धीची, देवी आहे. तिला कमळ,गुलाबाचे फूल प्रिय आहे. एक हातात कमळाचे फूल आहे.दुसरा हातात अभयमुद्रा आहेत.लाल,गुलबी रंगाची वस्त्र(साडी) परिधान केलेले असते.

श्रीलक्ष्मीनारायण हे परमेश्वर -परमेश्वरी संयुक्त रूपात आहे त्या जोडीला 'लक्ष्मी नारायण' वा , ' श्रीलक्ष्मीनारायण ' म्हणतात, विष्णूला नारायण म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या पत्नी लक्ष्मीबरोबर वैकुंठ म्हणजे विष्णूलोकात क्षीरमहासागरात अनंतशेषानागावर लक्ष्मीसह निवास करतात.

.



लक्ष्मीनारायणातील खालीलदिलेला चित्रात लक्ष्मी नारायणच्या कमलशरणाजवळ असते, जो क्षीरमहासागर शेषानागावर तरंगत आहेत.

जय-विजय हे दोघे वैकुंठाच्या द्वाराचे रक्षक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →