कोजागरी पौर्णिमा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कोजागरी पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 'कोजागरी पौर्णिमा' बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. 'कोजागरी पौर्णिमा" ही उजाळाची रात्र असल्यामुळे ह्या रात्री चंद्राची किरणे दुधात पडतात त्यामुळे जे आठवणारे दूध असते ते औषधीयुक्त तयार होऊन आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

या पौर्णिमेला 'माणिकेथारी' (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.

हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते.आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे.

मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →