कुबेर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कुबेर

कुबेर (संस्कृत : कुबेर ,इंग्रजी : Kubera ) हा हिंदू पुराणांप्रमाणे देवांचा खजिनदार आणि त्याचवेळी उत्तर दिशेचा दिक्पाल देव समजला जातो. तो विश्रवस्‌ ऋषींचा पुत्र होता तसेच लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊही होता. पित्याचे नाव 'विश्रवस्‌' असल्याने कुबेर वैश्रवण या पैतृक नावाने आणि मातेचे नाव इडविडा असल्याने कुबेर ऐडविड या मातृक नावानेदेखील तो ओळखला जातो. हिंदू पुराणांनुसार कुबेर हा यक्षांचा अधिपति समजला जातो.

बौद्ध धर्मातही वैश्रवण या नावाने ओळखला जाणारा कुबेर उत्तर दिशेचा दिक्पाल व यक्षांचा अधिपति मानला जातो.

ब्रह्मदेवाची वर्षनुवर्षे उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान बहाल केले. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी करून लंका आणि पुष्पक विमान यावर कब्जा केला. कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →