शारजा (अरबी: الشارقة) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर (दुबई व अबु धाबीखालोखाल) व शारजा अमिरातीचे राजधानीचे शहर आहे. शारजा शहर शारजा अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील एक मोठे शहर असलेल्या शारजाची लोकसंख्या २००८ साली सुमारे ८ लाख होती.
शारजा हे एक अमिरातीमधील एक सुबत्त शहर असून त्याला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. सध्या शारजा शहर देशाच्या एकूण जी.डी.पी.च्या ७.४ टक्के वाट्यासाठी कारणीभूत आहे. येथील शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका शारजाच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून शारजा बाहेर येत आहे.
शारजा
या विषयातील रहस्ये उलगडा.