शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (अरबी: لشارقة جمعية ملعب الكريكيت) हे संयुक्त अरब अमिराती देशाच्या शारजा शहरामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. १९८० च्या दशकात बांधलेल्या या मैदानात नंतर अनेक सुधारणा झालेल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: दुबईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व अबु धाबीमधील शेख झायेद क्रिकेट स्टेडियम ).
येथे आशिया चषक, चँपियन्स चषक तसेच इतर अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन झाले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आपले अनेक घरचे सामने येथे खेळतो. हे मैदान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे अधिकृत घरचे मैदान आहे.
२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.