शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना (जन्म : २१ नोव्हेंबर, १९२७ - २५ सप्टेंबर, इ.स. २०१३) हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले.
डोंबिवलीत झालेल्या २००३सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता.
ते डोंबिवलीत रहात. त्यांच्या पत्नीचे नाव अंजली, मुलाचे अरुण, सुनेचे जान्हवी. मुलगी राधिका, नातू शंतनू आणि पणतू ओम. वयाच्या ८६व्या वर्षी शं.ना. नवरे यांचे निधन झाले. अरुण आणि जान्हवी हे दोघेही ॲडव्होकेट आहेत.
शंकर नारायण नवरे
यामागील विज्ञान आणि इतिहास.