माधव मनोहर

या विषयातील रहस्ये उलगडा.

माधव मनोहर (जन्म : नाशिक, २० मार्च, १९११ - १६ मे, इ.स. १९९४) (मूळ नाव माधव मनोहर वैद्य) हे मराठी समीक्षक, नाटककार, लेखक होते. बी.ए. असले तरी मुंबईतील एस.एन..डी.टी. कॉलेजात ते प्राध्यापक झाले आणि तेथूनच निवृत्त झाले. चित्रपट समीक्षक व लेखक गणेश मतकरी हे त्यांचे नातू आहेत.

इंग्रजी वाङ्‌मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी साहित्य आणि मराठी नाटक खूपच खुजे आणि परावलंबी असल्याची जाणीव झाली. येथूनच पुढे माधव मनोहर या समीक्षकाचा उदय झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्‌मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला. दैनिक केसरीत ’चौपाटीवरून’ या सदरात, व ’सोबत'मध्ये ’पंचम' या सदरातून ते नाट्यसमीक्षणे लिहीत असत. ’नवशक्ती’, ’रत्‍नाकर, ’रसरंग’मधूनही त्यांचे समीक्षालेख प्रकाशित होत. त्यांचे स्वतःचे साहित्य आहे त्यापेक्षा त्यांचे समीक्षासाहित्य अधिक आहे, त्यामुळे माधव मनोहर हे नाव साहित्यिकांच्या पंक्तीतून समीक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →