गणेश मतकरी हे वास्तुविशारद, अभिनेते, चित्रपट समीक्षक-निर्माते-दिग्दर्शक व मराठी लेखक आहेत. ते रत्नाकर मतकरी यांचे चिरंजीव आणि माधव मनोहर वैद्य यांचे नातू आहेत. दूरचित्रवाणीवरच्या ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ह्या मालिकेत त्यांनी चिमणरावांच्या राघू या पुत्राचे काम केले होते.
रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर २०१३ साली 'इन्व्हेस्टमेन्ट' नावाचा मराठी चित्रपट निघाला होता. गणेश मतकरी त्याचे सहदिग्दर्शक होते. त्यांनी SHOT नावाचा एक इंग्रजी लघुपटही दिग्दर्शित केला होता. हा लघुपट जर्मनीमधील सुरुवातीला स्टुटगार्ट येथील भारतीय चित्रपट महोत्सवात अग्रक्रमाने दाखवला गेल्यानंतर इतर अनेक चित्रपट महोत्सवांतही प्रदर्शित झाला.
गणेश मतकरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.