व्हेरॉनिका एदुआर्दोव्ना कुदेर्मेतोव्हा (२४ एप्रिल, १९९७:मॉस्को, रशिया - ) ही एक रशियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. हिने एलिस मेर्टेन्ससोबत २०२५ विम्बल्डन दुहेरी स्पर्धा जिंकली.
कुदेर्मेतोव्हाचे वडील एदुआर्द कुदेर्मेतोव्ह व्होल्गा तातार वंशाचे असून ते रशियाच्या राष्ट्रीय आइस हॉकी संघाचा भाग होते. तिने वयाच्या आठव्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. तिची धाकटी बहीण पॉलिना कुदेर्मेतोव्हा (जन्म २००३) देखील एक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
कुदेर्मेतोव्हाने आपल्या टेनिस प्रशिक्षक आणि माजी व्यावसायिक खेळाडू सर्गेई डेमेखाइनशी लग्न केले आहे.
व्हेरॉनिका कुदेर्मेतोव्हा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!