व्हेनेतो (इटालियन: Veneto; लॅटिन: Venetia; व्हेनेशियन: Vèneto) हा इटली देशाच्या ईशान्य भागातील एक प्रदेश आहे. व्हेनेतोच्या पूर्वेस एड्रियाटिक समुद्र व फ्रुली-व्हेनेझिया जुलिया, पश्चिमेस लोंबार्दिया, दक्षिणेस एमिलिया-रोमान्या व उत्तरेस त्रेन्तिनो-आल्तो अदिजे हे प्रदेश आहेत. उत्तरेकडील काही भाग ऑस्ट्रियाच्या सीमेवर आहे. व्हेनिस ही व्हेनेतोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
प्रागैतिहासिक काळापासून व्हेनिसचे प्रजासत्ताक ह्या जगातील सर्वात बलाढ्य व श्रीमंत साम्राज्याचा भाग असलेले व्हेनेतो अनेक दशके स्वतंत्र राष्ट्र होते. नेपोलियनने व्हेनिसचे प्रजासत्ताक बरखास्त करून हा प्रदेश ऑस्ट्रियन साम्राज्याला जोडला. इ.स. १८८६ साली व्हेनेतो इटलीचा प्रदेश बनला. आजच्या घडीस व्हेनेतोला इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. दरवर्षी सुमारे ६ कोटी पर्यटक येथे भेट देतात. इटालियन सोबत व्हेनेशियन ही देखील येथील एक प्रमुख भाषा आहे.
येथील ५ स्थाने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये आहेत.
व्हेनेतो
या विषयावर तज्ञ बना.