वॉर्न-मुरलीधरन चषक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वॉर्न-मुरलीधरन चषक

२००७-०८ मोसमापासून ऑस्ट्रेलिया-श्रीलंका कसोटी मालिका विजेत्याला वॉर्न-मुरलीधरन चषक देऊन गौरविण्यात येते. सदर चषकाचे नामकरण हे कसोटी क्रिकेटमधील दोन अव्वल गोलंदाजांच्या नावावरून देण्यात आले आहे, श्रीलंकेचा मुथिया मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न. ह्या चषकाने ऑस्ट्रेलिया-श्रीलंका कसोटी क्रिकेटचा २५वा वर्धापनदिन साजरा केला. चषकावर दोन्ही गोलंदाजांच्या उजव्या हाताचे साचे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत वापरलेले चेंडू यांचा समावेश आहे. श्रीलंकेमधील क्रिकेटचे नियामक मंडळ श्रीलंका क्रिकेटने, त्यांचे ऑस्ट्रेलियाचे सहकारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लिहिले की, विजेत्याला दोन गोलंदाजावरून नाव दिला गेलेला चषक देण्यात यावा. ज्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सहमती दर्शवली. चषकाचे अनावरण करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विधान केले की,



... क्रिकेट जगताच्या इतिहासातील दोन महान गोलंदाजानी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या एका शाश्वत पारितोषिकाला त्यांची नावे दिले आहे.



ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यानच्या कसोटी मालिकेसाठी दिला जाणारा बॉर्डर-गावस्कर चषक, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेसाठी दिला जाणारा चॅपेल-हॅडली चषक यानंतर वॉर्न-मुरलीधरन चषक हे माजी क्रिकेट खेळाडूंच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या यादीमधील नवीन नाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →