वीज ही एक नैसर्गिक घटना आहे जी दोन विद्युतभाराने भरलेल्या प्रदेशांमधील वातावरणातून विद्युतस्थितिक निर्भारणाने तयार होते. हे दोन प्रदेश एकतर दोन्ही वातावरणात अस शकतात किंवा एक तावरणात आणि एक जमिनीवर असू शकतात. ह्यात २०० मेगाज्युल्स ते ७ गिगाज्युल ऊर्जा तात्काळ सोडली जाते. या स्त्रावमुळे विजाणूंच्या जलद हालचालींमुळे उष्णता व प्रकाश निर्माण होतात. विजेमुळे मेघगर्जना होते ज्यातून आवाज देखील निर्माण होतो.
विजेचे पहिले ज्ञात छायाचित्र १८४७ मधील थॉमस मार्टिन इस्टरलीने काढले आहे. पहिले अस्तित्वात असलेले छायाचित्र १८८२ मध्ये विल्यम निकोल्सन जेनिंग्सने काढले आहे. जेनिंग्सने आपल्या बहुतांष आयुष्यात विजेची छायाचित्रे काढली आणि त्यातील विविधता सिद्ध करण्यात घालवले.
वीज (हवामान)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?