विमान वाहतूक कंपनी

या विषयावर तज्ञ बना.

विमान वाहतूक कंपनी

विमान वाहतूक कंपनी ही प्रवासी व मालाची हवाई वाहतूक करणारी कंपनी आहे.

नोव्हेंबर १९०९ मध्ये स्थापन झालेली डेलाग (जर्मन: Deutsche Luftschiffahrts-Aktiengesellschaft) ही फायदेतत्त्वावर हवाई वाहतूक करणारी जगातील सर्वात पहिली कंपनी होती. १९१९ सालापासून सतत सेवेत असणारी के.एल.एम. ही जगातील सर्वात जुनी कंपनी आहे. सध्या अनेक देशांमध्ये विमान कंपन्यांवर पूर्णपणे त्या देशातील सरकारचे नियंत्रण असून खाजगी कंपन्यांना परवानगी नाही. भारतासह बव्हंशी देशांमध्ये नागरी उड्डाण खुले असून अनेक कंपन्या विमान वाहतूक चालवू शकतात.

आय.ए.टी.ए. व आय.सी.ए.ओ. ह्या दोन आंतरराष्ट्रीय संस्था जगातील हवाई वाहतूक नियंत्रित करतात. एरबस व बोइंग ह्या विमान उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख कंपन्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →