सिंगापूर एरलाइन्स

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सिंगापूर एरलाइन्स

सिंगापूर एरलाइन्स (Singapore Airlines) ही आग्नेय आशियामधील सिंगापूर देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया ह्या खंडांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या सिंगापूर एरलाइन्सद्वारे ३५ देशांमधील ६२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

एअरबसचे एअरबस ए३८० हे सुपरजंबोजेट विमान वापरात आणणारी सिंगापूर एरलाइन्स ही जगातील पहिली कंपनी होती. प्रवासी वाहतूकीमध्ये सध्या दहाव्या क्रमांकावर असलेली सिंगापूर एरलाइन्स जगातील सर्वोत्तम विमान कंपन्यांपैकी एक मानली जाते. १४ अब्ज अमेरिकन डॉलर इतके बाजार मूल्य असलेली सिंगापूर एरलाइन्स २०१० साली जगातील दुसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →