लुफ्तान्सा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

लुफ्तान्सा

दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा (जर्मन: Deutsche Lufthansa AG)) ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसऱ्या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते. लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत.

लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे. लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत. लुफ्तांसाकडे १,१७,००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली (यात ब्रसेल्स एरलाइन्स आणि जर्मनविंग्सच्या प्रवाशांची गणती नाही).



लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे. जेटब्ल्यू, ब्रसेल्स एरलाइन्स इत्यादी विमानकंपन्यांमध्ये लुफ्तान्साची भागीदारी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →