विजयेंद्र घाटगे हे हिंदी चित्रपट आणि भारतीय दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. डीडी नॅशनलवर प्रसारित १९८६ मधील टीव्ही मालिका बुनियाद मधील लाला ब्रिजभानच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. याशिवाय चितचोर, प्रेमरोग, दामिनी, देवदास (२००२) आणि झंकार बीट्स या चित्रपटांमधील भूमिकांसाठी देखील ते ओळखले जातात.
घाटगे हे कागलच्या राजघराण्याचे सदस्य आहेत आणि इंदूर आणि कोल्हापूरच्या इतर मराठा राजघराण्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची आई 'सीता राजे घाटगे' ह्या इंदूरचे महाराजा 'तुकोजीराव होळकर-तृतीय' यांची मुलगी आहे.
इंदूरच्या डेली कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले. या कॉलेज मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेत ते स्वोर्ड ऑफ ऑनर (फ्लाइट सार्जंट एअरिंग एनसीसी)चे हेड प्रीफेक्ट आणि धारक होते. सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी बी.कॉम ऑनर्स (मॅनेजमेंट) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथून अभिनयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला.
विजयेंद्र घाटगे यांच्या वडिलांचे नाव फतेहसिंह राव दत्ताजी राजे घाटगे होते, ते कागलचे वस्सल, मराठा साम्राज्याचे जहागीर आणि आई सीतादेवी, इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर आणि महाराणी शर्मिष्ठा देवी बाई यांची मुलगी होती. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगेचे ते काका आहेत परंतु काहीवेळेस नामसाधर्म्यामुळे त्यांना चुकीने सगरिकाचे वडील समजले जाते.
विजयेंद्र घाटगे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!