मोहम्मद अझरुद्दीन एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेट खेळाडू आहे. 1990च्या दशकात त्यांनी 47 कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. सन 2000 मध्ये कुप्रसिद्ध मॅच फिक्सिंग प्रकरणात फिक्सिंग झाल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. 8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. 2009 मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ति किटावर मोरादाबाद मतदारसंघातून अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोहम्मद अझहरुद्दीन
थोडक्यात पण महत्त्वाचे.