आभासी दृश्यप्रत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

आभासी दृश्यप्रत (इंग्रजी: Apparent magnitude; चिन्ह m) ही खगोलीय वस्तूची पृथ्वीवरील निरीक्षकाला भासणारी प्रखरता/तेजस्विता दर्शवणारी संख्या आहे. ही संख्या जितकी लहान तितका तारा जास्त तेजस्वी दिसतो. -२७ आभासी दृश्यप्रत असलेला सूर्य आकाशातील सर्वात तेजस्वी वस्तू आहे. एखादी वस्तू जेवढी जास्त तेजस्वी असते, तिची दृश्यप्रत तेवढी कमी असते. त्याचबरोबर दृश्यप्रत मापणीची पद्धत लॉगॅरिदमिक असते: म्हणजे दृश्यप्रतीमधील एका एककाचा फरक म्हणजे प्रखरतेमध्ये











100



5











{\displaystyle {\sqrt[{5}]{100}}}



इतक्या म्हणजे २.५१२ पटीचा फरक असतो.

सामान्यत: आभासी दृश्यप्रत सांगण्यासाठी दृश्य वर्णपटाचा आधार घेतला जातो. पण काही वेळा इतर वर्णपटही वापरले जातात (उदा. अवरक्त). दृश्य वर्णपटामध्ये

सूर्यानंतर व्याध दुसरा सर्वात तेजस्वी तारा आहे. निकट अवरक्त मधील जे-बॅंडमध्ये काक्षी (भरत) तारा सर्वात तेजस्वी तारा आहे. ताऱ्यांची आभासी दृश्यप्रत बोलोमीटर या यंत्राने मोजतात.

पुढील तक्त्यामध्ये रात्रीच्या आकाशातील किती आभासी दृश्यप्रतीचे तारे उघड्या डोळ्यांनी दिसू शकतात किंवा नाहीत व त्यांची संख्या दिली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →