विजय वडेट्टीवार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

विजय वडेट्टीवार

विजय नामदेवराव वडेट्टीवार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप व पुनर्वसन या विभागांचे कॅबिनेट मंत्री होते.

वडेट्टीवार हे माजी मंत्री असून चिमूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेत झाली असून, नंतर त्यांनी नारायण राणे यांचेसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसच्या पक्षातर्फे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादनशुल्क मंत्री यांना २७ ऑगस्ट २०२० रोजी, सर्वप्रथम पत्र लिहून दारुबंदी उठवण्याची मागणी केली होती.

२०२४ विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना काँग्रेस च्या विधीमंडळ पक्षनेते (CLP-leader) पदी निवड करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →