वासुदेव मुलाटे

या विषयावर तज्ञ बना.

डाॅ. वासुदेव मुलाटे हे मराठवाड्यातील ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक आहेत. चाळीसहून अधिक वर्षे ते कथा लिहीत आले आहेत. या काळात निम्न ग्रामीण भाग जसजसा बदलत गेला, त्या प्रमाणात ग्रामीण जनमानसही बदलत गेले. त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात मुलाटे यांच्या कथांमध्ये दिसते.

डॉ. वासुदेव मुलाटे यांनी मराठी विषयातून एम्.ए. बरोबरच डॉक्टरेट संपादित केली. अौरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपिठाच्या मराठी विभागातून प्रपाठक म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. काही काळ पुणे येथील पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रपाठक म्हणून अध्यापनाचे काम केले.

ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीचे सदस्य असून, महाराष्ट्र ग्रामीण साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →