डॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
डॉ. इंगोले यांनी ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवनसंघर्ष मांडणाऱ्या त्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही आपल्या लेखनातून केलेला आहे. ले.
यांचे किमान दहा कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत.
त्यांचा ‘हजारी बेलपान’ हा निखळ वऱ्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर ‘जावायाचं पोर’ हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहांत या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.
डॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.
प्रतिमा इंगोले
यामागील विज्ञान आणि इतिहास.