विजया जहागीरदार (जन्म : इंदूर, १२ सप्टेंबर १९३२; - सोलापूर, १ एप्रिल २०२०) या एक मराठी लेखिका व कवयित्री होत्या. बालसाहित्यकार म्हणून त्या जास्त परिचित आहेत. त्या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. सोलापूरचे २००६ साली झालेले २०वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन विजया जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून त्यांच्या 'ययातिकन्या माधवी' आणि 'काव्य कोडी' या पुस्तकाचे वाचन झाले होते. मनोरंजक विज्ञान या विषयावरदेखील जहागीरदारांनी विपुल लेखन केले आहे.
विजया जहागीरदार या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या होत.
विजया जहागीरदार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.