डॉ. सुहासिनी इर्लेकर (जन्म : सोलापूर-महाराष्ट्र, इ.स. १९३२; - -बीड-महाराष्ट्र, २८ ऑगस्ट २०१०) या मराठी कवयित्री आणि लेखिका होत्या. संत साहित्याच्या अभ्यासक असलेल्या इर्लेकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला पीएच.डी होत्या.
डॉ. सुहासिनी इर्लेकर या बीड येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागात विभागप्रमुख होत्या. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलेजचे वाङ्मय मंडळ विकसित केले होते. इर्लेकरांचे १०हून अधिक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
सुहासिनी इर्लेकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.