वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा मुंबई-कोलकाता या प्रमुख रेल्वे मार्गावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
वर्धा जिल्ह्याची पश्चिम सीमा वर्धा नदी निश्चित करते. वर्धेचे पूर्वी नाव पालकवाडी असे होते, परंतु "वर्धा" नदीच्या नावावरूनच या ठिकाणाला वर्धा हे नाव देण्यात आले.
१८६६ साली स्थापित झालेले हे शहर कापूस व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.
२०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती.
सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे. येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
१९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते.
वर्धा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.