ठाणे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ठाणे

ठाणे (ठान्हा) शहर हे फार प्राचीन शहर असून या शहराचा उल्लेख मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात आपल्याला सापडतो, आता मात्र ठाणे औद्योगिक दृष्टीकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे, ठाणे शहर मुंबईसारख्या महानगराला जोडले गेले असल्याने त्या महानगराची संस्कृती आता ठाण्याने आत्मसात केली आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते.

ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक आहे.

खरं तर ठाणे शहराची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे.तरी देखील आता या शहरात उत्तर भारतीय, सिंधी, गुजराती, दक्षिण भारतीय, मुस्लिम, मारवाडी अश्यांसारखे कितीतरी समाजाचे लोक या ठिकाणी स्थलांतरीत झालेले आणि आपले उद्योग व्यवसाय मोठया प्रमाणात विस्तारीत केलेले पहायला मिळतात.

तलावांचा जिल्हा म्हणून देखील ठाणे जिल्हा ओळखला जातो. जवळजवळ ३५ तलाव या शहरात आपल्याला पहायला मिळतात, त्यातला मासुंदा तलाव अधिक सुंदर आणि परिसर प्रसन्न आहे.शहरात अनेक हिरव्यागार निसर्गरम्य टेकडया व डोंगर बघायला मिळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →