अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर ही संबोधले जाते. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दृष्टीने दोन उपविभाग केले आहेत ते म्हणजे नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे ५ जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगरक्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे व विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण यांची मंदिरे आहेत.
१९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही खाजगी जकात म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली व एकमेव? महानगरपालिका आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६,४६,८०१ इतकी आहे.
त्यापैकी ३,३०,५४४ पुरुष व ३,१६,२५७ महिला आहेत.
अमरावती शहरातील लिंग गुणोत्तर १०००:९५७ आहे.
अमरावती
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.