कुर्ला

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कुर्ला

कुर्ला (कुर्ले, इंग्रजीत Coorla / Kurla; पोर्तुगीजमध्ये Corlem) हे मुंबई शहराचे एक विस्ताराने मोठे असे उपनगर आहे. हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला तालुक्याचे मुख्यालय आहे. या जागेचे नाव तिथले ईस्ट इंडियन गावावरून ठेवले आहे. हे क्षेत्र मुंबई महानगर पालिकेच्या 'एल' वॉर्ड मध्ये येते. मिठी नदीच्या काठावर व मुंबई-आग्रा रोडवर (लाल बहादूर शास्त्री मार्गावर) आहे. कुर्ला रेल्वे स्थानक मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून गणले जाते. मुंबईतून बाहेर पडणाऱ्या गाड्या ज्या ज्या टर्मिनसवरून निघतात त्यांपैकी कुर्ला टर्मिनस हे एक महत्त्वाचे टर्मिनस आहे. ते कुर्ल्याजवळच्या टिळकनगर या लोकल रेल्वेच्या स्थानकाजवळ असल्याने कुर्ला टर्मिनसचे नाव बदलून लोकमान्य टिळक टर्मिनस करण्यात आले. वांद्रे आणि कुर्ला यांच्या दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल हे मुंबईमधील मोठे वाणिज्य केंद्र आहे. मुंबई विमानतळ (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ) कुर्ल्याच्या उत्तरेस आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →