देहू रोड

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

देहूरोड (किंवा देहू रोड) हे पुण्याच्या वायव्येला असलेले पुणे स्टेशनपासून २७ किलोमीटर अंतरावरील लष्कराचे ठाणे आहे. येथे नागरी वस्तीसुद्धा आहे. लष्कराच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला एक फार मोठ्या विस्ताराचा व्हेइकल डेपो (देहू व्हेइकल डेपो DVD) येथे आहे. तसेच आयुध निर्माणीं देहूरोड येथे भारतीय मजदूर संघ संबद्धित भारतीय संरक्षण कामगार संघ, कामगार संगठन आहे,देहूरोड बाजार येथे(रमनभाई शहा भवन) नावाने भारतीय मजदूर संघाचे कार्यालय आहे.

पुण्याहून येथे नोकरीसाठी येणाऱ्या लोकांसाठी येथे रेल्वे स्थानक आहे. पुणे-मुंबई महामार्ग देहूरोड गावातून जातो. संत तुकारामांच्या देहू गावाला जाण्यासाठी येथून रस्ता आहे, म्हणून या स्टेशनचे आणि त्यावरून गावाचेही नाव देहू रोड पडले. त्याअर्थाने देहूरोडला पुण्याचे उपनगर समजले जाते. प्रत्यक्षात तसे नसले तरी, देहूरोड येथे नोकरी करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुण्यात मिळतात ते सर्व भत्ते मिळतात.

रक्षा मंत्रालयाच्या कामगार विरोधी निर्णया विरुद्ध आयुध निर्माणृी,डेपो,आर्मीबेस वर्कशाप,मिलिट्री इनिर्जिर सर्विस तसेच ईतर विभागातील खाजगीकरण. नवीन कर्मचारी जे 2004 नंतर भरती झाले आहे त्याची नवीन पैंशन रद्द करून जुन्या पैंशन लागु करण्यासाठी मजदूर हिताच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी रक्षा मंत्रालय मान्यता प्राप्त तीन महासंघाच्या तीन दिवसीय संप दि.23-24-25/2019 करण्यात आला.

त्यात संपात सहभाग न घेतल्याने TUCC संबंधित OFEU युनियनची मान्यता सेंट्रल ट्रेड युनियन (TUCC) ने मान्यता रद्द केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →