पुणे हे भारताच्या दख्खन पठारावरील महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे शहर आहे. पुणे जिल्ह्याचे आणि पुणे विभागाचे हे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११ जनगणनेनुसार, शहराच्या हद्दीतील ३.१ दशलक्ष लोकसंख्येसह पुणे हे भारतातील नववे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. महानगर प्रदेशातील ७.२ दशलक्ष रहिवासी लोकसंख्या आहे, यानुसार ते आठवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. पुणे शहर पुणे महानगर प्रदेशाचा एक भाग आहे. भारतातील सर्वात मोठ्या आयटी हबपैकी पुणे एक आहे. हे भारतातील सर्वात महत्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. पुणे हे एक विकसनशील शहर आहे. या शहराला येथील उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमुळे "पूर्वेकडील ऑक्सफर्ड" म्हणून संबोधले जाते. "भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर" म्हणून अनेक वेळा पुण्याला स्थान देण्यात आले आहे.
पुण्यावर राष्ट्रकूट राजघराणे, अहमदनगर सल्तनत, मुघल, आदिल शाही घराणे यांनी राज्य केले आहे. १८ व्या शतकात हे शहर मराठा साम्राज्याचा भाग होते, आणि मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, पेशव्यांची हे आसन होते. पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा, शिंदे छत्री, विश्रामबाग वाडा यासारख्या अनेक ऐतिहासिक खुणा या कालखंडातील आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील ऐतिहासिक स्थळे शहरभर पसरलेली आहेत.
संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, संत तुकाराम, पहिले बाजीराव पेशवे, बालाजी बाजीराव, माधवराव पहिले, नाना फडणवीस, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींसह पुणे ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. पुणे शहरात किंवा पुणे महानगर प्रदेशात येणाऱ्या भागात त्यांचे जीवनकार्य केले. गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांसारख्या लोकांनी त्यांच्या काळात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावल्याने पुणे हे ब्रिटिश राजवटीच्या प्रतिकाराचे प्रमुख केंद्र होते.
पुणे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!