कामेरी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कामेरी (तालुका वाळवा) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे २०,००० इतकी आहे. हे गाव शिराळा विधानसभा मतदार संघात मोडते.

गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर आहे. हे गाव कोल्हापूर पासून पश्चिमेला 40 किलोमीटर व कराड पासून 35 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. गावात बारा बलुतेदार व आठरा अलुतदार यांच्या बरोबर अनेक वस्ती आहेत. गावाच्या दक्षिणेला वारणा ही नदी 24 किलोमीटर व उत्तर बाजूस कृष्णा नदी 22 किलोमीटर आहे. उरुण इस्लामपूर पासून 4 किलोमीटर वर गाव वसले आहे. गावामध्ये विविध दैवताचे धार्मिक स्थळे आहेत. मुख्य भाषा मराठी असून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात.

कामेरी स्वातंत्र्य काळापासून आमदार रामचंद्र पाटील (कारभारी) स्वातंत्र्य नंतर आमदार के.डी. पाटील यांनी विधानसभा व विधानपरिषद प्रतिनिधित्व केले आहे.

कामेरी मध्ये कृषी क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व कृषिभूषण जगदीश शामराव पाटील व सिनेस्टार विलास यशवंत रकटे यांचे गाव असल्यामुळे कामेरी गावाला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. "नाट्यपंढरी, "कृषीपंढरी" ह्या नावानेही संबोधलं जातं.

कबड्डीपट्टू गाव अशीही कामेरीची ओळख आहे.

कामेरी गाव हे कबड्डी पट्टूसाठी प्रसिद्ध आहे.

स्वातंत्र्य सैनिक -

कामेरी गावचा इतिहास स्वातंत्र्य पूर्व काळापासून खूप ऐतिहासिक असा आहे, कामेरी गावामध्ये हुतात्मा स्मारक हुतात्मा विष्णू बारपटे यांचे स्मारक आहे.

थोर स्वातंत्र्य सैनिकांचे गावं म्हणून ओळखले जाते,भारताच्या इतिहासात कामेरी गावात ११४ स्वातंत्र्य सैनिक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →