तुळजापूर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात.

तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील १५५४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २९९ कुटुंबे व एकूण १३९२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर तुळजापूर ११ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७२५ पुरुष आणि ६६७ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २०० असून अनुसूचित जमातीचे ४४ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६१५३४ आहे.

सोलापूर शहरापासून जवळपास ४५ किलोमीटर अंतरावर आहे. तुळजापूर कानडा भाविक मोठ्या प्रमाणात येतो. सोलापुरातून जाण्यासाठी एस टीची सोय आहे. आणि राहण्यासाठी कमी दरात लॉज उपलब्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →