वंदना शिवा

या विषयावर तज्ञ बना.

वंदना शिवा

वंदना शिवा ( ५ नोव्हेंबर १९५२; देहरादून, उत्तराखंड, भारत) या भारतीय तत्त्वज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्यांनी २०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे भौतिकशास्त्रात शिक्षण झाले आहे आणि कॅनडातील ओंटॅरिओ येथील विद्यापीठातून इ.स. १९७८ मध्ये त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्या इंटरनॅशनल फोरम ऑन ग्लोबलायझेशन संघटनेच्या संचालक मंडळावर आहेत. इ.स. १९९३ मध्ये त्यांना राईट लाईव्हलीहूड पुरस्काराने आणि २०१० मध्ये त्यांना सिडनी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७० च्या दशकात वंदना शिवा यांनी अहिंसात्मक चिपको आंदोलनात भाग घेतला. झाडांची तोड थांबवण्यासाठी झाडांना मिठी मारून महिला उभ्या रहात व झाडाचे संरक्षण करीत. वंदना शिवा ह्या जेरी मँडर, एडवर्ड गोल्डस्मिथ, राल्फ नॅडर, जेरेमी रिफकिन इत्यादींसोबत जागतिकीकरणासंबंधित आंतरराष्ट्रीय फोरमच्या नेत्यांमधील एक आहेत. जागतिकीकरणामध्ये परिवर्तन घडवा (आल्टर-ग्लोबलाइझेशन मूव्हमेंट) हे एका जागतिक एकात्मता आंदोलनाचे नाव आहे. त्यांनी अनेक परंपरागत पद्धती वैज्ञानिक स्वरूपात सादर केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →