अतिश श्रीपाद दाभोलकर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अतिश श्रीपाद दाभोलकर ( १६ सप्टेंबर १९६३, कोल्हापूर) हे भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेन्टर फॉर थिओरिटिकल फिजिक्स (आय सी टी पी) च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. त्याआधी ते आय.सी.टी.पी च्या उच्च ऊर्जा, विश्वविज्ञान आणि खगोल भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी कार्यरत होते. स्ट्रिंग थियरी, कृष्णविवरे आणि पुंजकीय गुरुत्व याकरता ओळखले जाणारे दाभोलकर हे भारतीय विज्ञान अकादमीचे निर्वाचित सदस्य आहेत. २००६ साली वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद (कॉऊंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) या भारतातील वैज्ञानिक संशोधनाच्या सर्वोच्च संस्थेकडून पदार्थ विज्ञानातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट युवा नेतृत्व म्हणून आय आय एम राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. फ्रान्सच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या चेअर ऑफ एक्सलन्स् या पुरस्काराचे ते मानकरी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →