संघमित्रा बंडोपाध्याय (जन्म 1968) एक भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी संगणकीय जीवशास्त्रात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. त्या भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथे प्राध्यापिका असून, त्या २०१० साठी अभियांत्रिकी विज्ञानातील शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या तसेच अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान श्रेणीतील इन्फोसिस पारितोषिक २०१७ च्या विजेत्या आहेत. त्यांचे प्रामुख्याने उत्क्रांती गणन, नमुना ओळख, मशीन लर्निंग आणि बायोइन्फॉरमॅटिक्स या क्षेत्रात संशोधन केले आहे.
१ ऑगस्ट २०१५ पासून, त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालिका आहेत, आणि त्या संस्थेच्या कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि तेजपूर येथे असलेल्या सर्व पाच केंद्रांच्या कामकाजावर देखरेख करतात, तसेच भारतभर पसरलेल्या इतर अनेक सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रण आणि ऑपरेशन रिसर्च युनिट्सचे काम पाहतात. भारतीय सांख्यिकी संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालक आहेत. सध्या त्या पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार समितीवर आहेत.
संघमित्रा बंदोपाध्याय
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?