यमुना कृष्णन (२५ मे १९७४) या शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म भारतातील केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील परप्पानंगडी येथे पीटी कृष्णन आणि मिनी यांच्याकडे झाला. शिकागो विद्यापीठात त्या ऑगस्ट २०१४ पासून काम करत आहेत. त्या पूर्वी नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, बंगलोर, भारत येथे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी होती. यमुना कृष्णन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पारितोषिक जिंकले , रासायनिक विज्ञान श्रेणीमध्ये २०१३ साली भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार पटकावला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यमुना कृष्णन
थोडक्यात पण महत्त्वाचे.