दीपक धर (Deepak Dhar - जन्म 30 ऑक्टोबर 1951) हे भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ ( theoretical physicist ) आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे येथील भौतिकशास्त्र विभागातील एक प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत. २०२२ मध्ये विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार (Boltzmann Medal) सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ डॉ. दीपक धर यांना घोषित झाला आहे. त्याच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रा. धर यांचे संशोधन प्रामुख्याने अनिश्चित प्रक्रियांच्या गणिती प्रारूपांवर आहे. त्यांच्या संशोधनाचा उपयोग शेअर बाजारापासून ते प्रोटीन आणि भूकंपाच्या अनुमानापर्यंत अनेक क्षेत्रांमधील मॉडेलमध्ये केला जातो. भौमितिक रचनांची कार्यप्रणाली (फ्रॅक्ट्रल्स), स्व-संघटित क्लिष्ट रचना, प्राण्यांशी निगडित संख्याशास्रीय समस्या, चुंबक आणि काचेमधील बदलत्या रचनांचा सख्याशास्रीय अभ्यास हे डॉ. धर यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्ये आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीपक धर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.