लेस्ली ॲन मॅनव्हिल (जन्म १२ मार्च १९५६) ही एक इंग्रजी अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यातील ग्रोन-अप्स (१९८०), हाय होप्स (१९८८), सिक्रेट्स अँड लाईज (१९८०),अनदर इयर (२०१०) आणि फँटम थ्रेड (२०१७) सामील आहे. २०१० आणि २०१७ मध्ये तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी दोनदा ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. फँटम थ्रेड मधील कामासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
तीन वेळा लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार नामांकित, तिने २०१३-१४ मधील घोस्ट्स या नाटकाच्या पुनरुज्जीवनातील भूमिकेसाठी एकदा हा पुरस्कार जिंकला आहे. द क्राउन या दूरचित्रवाणी मालिकेत प्रिन्सेस मार्गारेट, काउंटेस ऑफ स्नोडॉन या भूमिकेमुळे तिला सहाय्यक अभिनेत्रीचे प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
लेस्ली मॅनव्हिल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.