ऑलिव्हिया विल्यम्स

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ऑलिव्हिया विल्यम्स

ऑलिव्हिया हे विल्यम्स (२६ जुलै १९६८ - ) ही एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. ही ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर दिसते. विल्यम्सने ब्रिस्टल ओल्ड विक थिएटर स्कूलमध्ये दोन वर्षे नाटकाचा अभ्यास केला आणि त्यानंतर तीन वर्षे रॉयल शेक्सपियर कंपनीत ती होती. जेन ऑस्टेनच्या कादंबरीवर आधारित ब्रिटिश दूरचित्रवाणी चित्रपट एम्मा (१९९६) मध्ये जेन फेरफॅक्स ही तिची पहिली महत्त्वाची भूमिका होती.

२०१७ ते २०१९ पर्यंत, तिने विज्ञान कथा दूरचित्रवाणी मालिका काउंटरपार्टमध्ये एमिली सिल्कची भूमिका केली. २०२२-२३ मध्ये विल्यम्सने नेटफ्लिक्सच्या ऐतिहासिक नाटक द क्राउनमध्ये त्याच्या शेवटच्या दोन सीझनमध्ये कॅमिला पार्कर बाउल्सची भूमिका साकारली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →