साराह कॅरोलिन सिंक्लेअर (जन्म ३० जानेवारी १९७४), व्यावसायिकपणे ऑलिव्हिया कोलमन म्हणून ओळखली जाते, ह्या एक इंग्रजी अभिनेत्री आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील त्यांच्या विनोदी आणि नाट्यमय भूमिकांसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांना एक अकादमी पुरस्कार, एक ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, दोन एमी पुरस्कार, तीन ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत.
ब्रिस्टल ओल्ड विक थिएटर स्कूलचे त्या पदवीधर असून, कोलमनला यश चॅनल ४ सिटकॉम पीप शो (२००३–१०१५) मध्ये आले. ट्वेंटी ट्वेल्व्ह (२०११-२०१२) या कॉमेडी कार्यक्रमासाठी कोलमनला सर्वोत्कृष्ट महिला विनोदी कामगिरीचा बाफ्टा पुरस्कार आणि गुन्हेगारी कार्यक्रम अक्यूस्ड (२०१२) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
ब्रॉडचर्च (२०१३-१०१७) या आय टिव्ही वरील क्राईम-ड्रामा मालिकेतील त्यांच्या अभिनयासाठी प्रशंसा झाली, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार मिळाला. कोलमन बीबीसी वन थ्रिलर मिनीसिरीज द नाईट मॅनेजर (२०१६) मध्ये देखील दिसल्या, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला (मालिका, लघु मालिका किंवा टेलिव्हिजन चित्रपट श्रेणीत). त्यांनी नेटफ्लिक्सवरील पीरियड-ड्रामा मालिका द क्राउनमध्ये २०१९ ते २०२० या कालावधीत क्वीन एलिझाबेथ दुसरीची भूमिका केली, ज्यासाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला.
द फेव्हरेट (२०१८) या काळातील ब्लॅक-कॉमेडी चित्रपटात ग्रेट ब्रिटनची राणी ॲनच्या भूमिकेसाठी, कोलमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. द फादर (२०२०) आणि द लॉस्ट डॉटर (२०२१) मधील अभिनयासाठी त्यांना अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले.
ऑलिव्हिया कोलमन
थोडक्यात पण महत्त्वाचे.