ज्युली वॉल्टर्स

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ज्युली वॉल्टर्स

डेम ज्युलिया मेरी वॉल्टर्स (जन्म २२ फेब्रुवारी १९५०), व्यावसायिकपणे ज्युली वॉल्टर्स म्हणून ओळखली जाते, ही एक इंग्रजी अभिनेत्री आहे. तिला चार ब्रिटिश अकादमी दूरचित्रवाणी पुरस्कार, दोन ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, दोन आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ऑलिव्हिये पुरस्कार मिळाला आहे .

वॉल्टर्सला अभिनय श्रेणींमध्ये दोन अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे—एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आणि एकदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी. २०१४ मध्ये तिला आजीवन कामगिरीबद्दल बाफ्टा फेलोशिपने सन्मानित करण्यात आले. तिला २०१७ मध्ये क्वीन एलिझाबेथ दुसरीने नाटकाच्या सेवांसाठी डेम (DBE) बनवले होते.

एज्युकेटिंग रीटा (१९८३) मध्ये मुख्य भूमिका साकारून वॉल्टर्सला प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट ज्या नाट्काच्या वेस्ट एंड प्रोडक्शन साकार झाला होता, त्यात वॉल्टर्सने काम केले होते. पर्सनल सर्व्हिसेस (१९८७), प्रिक अप युअर इअर्स (१९८७), बस्टर (१९८८), स्टेपिंग आउट (१९९१), सिस्टर माय सिस्टर (१९९४), गर्ल्स नाईट (१९९८), टायटॅनिक टाउन (१९९८), बिली इलियट (२०००), हॅरी पॉटर मालिका (२००१-२०११), कॅलेंडर गर्ल्स (२००३), बिकमिंग जेन (२००७), मम्मा मिया! (२००८) आणि त्याचा २०१८ चा पुढील भाग, ब्रेव्ह (२०१२), पॅडिंग्टन (२०१४) आणि त्याचा २०१७ चा पुढील भाग, ब्रुकलिन (२०१५), फिल्म स्टार्स डोंट डाय इन लिव्हरपूल (२०१७), आणि मेरी पॉपिन्स रिटर्न्स (२०१८) यासह ती इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. हॅरी पॉटर मालिलेमध्ये तिने मॉली विजलीची भूमीला साकारली.

नाटकात तिने २००१ च्या ऑल माय सन्सच्या पुनरुज्जीवनातल्या कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑलिव्हिये पुरस्कार जिंकला.

दूरचित्रवाणीवर, वॉल्टर्सने व्हिक्टोरिया वुडसोबत नियमितपणे काम केले; त्यांच्या प्रकल्पांमध्ये वुड अँड वॉल्टर्स (१९८१), व्हिक्टोरिया वुड: ॲज सीन ऑन टीव्ही (१९८५-१९८७), पॅट आणि मार्गारेट (१९९४), आणि डिनरलेडीज (१९९८-२०००) यांचा समावेश होता. माय ब्युटीफुल सन (२००१), मर्डर (२००२), द कँटरबरी टेल्स (२००३), आणि मो (२०१०) मधील भूमिकांसाठी तिने इतर कोणत्याही कलाकारापेक्षा चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ब्रिटिश अकादमी दूरचित्रवाणी पुरस्कार जिंकला आहे. वॉल्टर्स आणि हेलन मिरेन या एकमेव अभिनेत्री आहेत ज्यांनी सलग तीन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे आणि वॉल्टर्स या श्रेणीतील सर्वाधिक नामांकनांसाठी सातसह जुडी डेंच यांच्याशी बरोबरी करत आहे. अ शॉर्ट स्टे इन स्वित्झर्लंड (२००९) आणि मो (२०१०) मधील तिच्या भूमिकांसाठी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. २००६ मध्ये, ब्रिटिश जनतेने आय टिव्ही च्या ५० ग्रेटेस्ट स्टार्सच्या सर्वेक्षणात वॉल्टर्सला चौथ्या क्रमांकावर मत दिले होते.

ज्युलिया मेरी वॉल्टर्सचा जन्म २२ फेब्रुवारी १९५० रोजी सेंट चाड हॉस्पिटल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे झाला. मेरी ब्रिजेट (पोस्टल क्लर्क) आणि थॉमस वॉल्टर्स (बिल्डर आणि डेकोरेटर) यांची ही मुलगी. तिचे आजोबा थॉमस वॉल्टर्स हे दुसऱ्या बोअर युद्धात सैनिक होते आणि रॉयल वॉर्विकशायर रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनमध्ये सेवा करत असताना जून १९१५ मध्ये पहिल्या महायुद्धात ते मारले गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →